प्रेसिडेंट ऑफ भारत...! सरकारनं बदललं 'इंडिया' नाव?; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:02 PM2023-09-05T12:02:32+5:302023-09-05T12:03:15+5:30

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्या अमृत कालाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा केली आहे

President of India...Government changed the name 'India'?; Congress leader's Jairam Ramesh claim | प्रेसिडेंट ऑफ भारत...! सरकारनं बदललं 'इंडिया' नाव?; काँग्रेस नेत्याचा दावा

प्रेसिडेंट ऑफ भारत...! सरकारनं बदललं 'इंडिया' नाव?; काँग्रेस नेत्याचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली – संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सरकारने अचानक बोलावलेल्या विशेष अधिवेशनात नेमके काय होणार याची कुणालाही कल्पना नाही. त्यात आधी एक देश, एक निवडणूक, त्यानंतर महिला आरक्षण आणि आता विरोधी पक्षाकडून वेगळाच दावा करण्यात येत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट करून हा दावा केला आहे.

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये जी-२० संमेलनासाठी ज्यांना डिनरसाठी निमंत्रित केले आहे ज्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. ही बातमी खरीच आहे. राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबरवर जी-२० संमेलनाच्या डिनरसाठी निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. त्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. जर संविधानाचे कलम १ वाचले तर त्यात भारत जो इंडिया आहे एका राज्यांचा संघ असेल. आता संघराज्याला धोका निर्माण झाला आहे असा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्या अमृत कालाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा केली आहे. परंतु कुठलाही निश्चित अजेंडा समोर आला नाही. त्यामुळे विविध चर्चा सुरू आहेत. विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणूक, महिला आरक्षण विधेयक आणि इंडियाऐवजी भारत यासारख्या विधेयक अथवा प्रस्ताव आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडिया नाव बदलणार?

जर इंडिया आणि भारत नावाची चर्चा सुरू आहे तर संविधानात ज्या ज्या ठिकाणी इंडिया शब्दाचा वापर आहे तिथे भारत केले जाणार आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, आपल्या देशाचे खूप वर्षाआधी भारत असं नाव होते. त्यामुळे याला इंडिया असं बोलायला नको. त्याशिवाय राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी इंडिया हा शब्द गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे संविधानात भारत शब्दाचा उल्लेख करायला हवा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा काही खासदारांनी उपस्थित केला होता. त्यामुळे विशेष अधिवेशनात याबाबत काही प्रस्ताव अथवा विधेयक आणलं जातंय का हे पाहणे गरजेचे आहे.

Web Title: President of India...Government changed the name 'India'?; Congress leader's Jairam Ramesh claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.