'अध्यक्ष' राहुल गांधींचा बर्थ डे 'हॅप्पी'; तीन राज्यं काँग्रेसच्या 'हाती'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:41 AM2018-12-11T11:41:52+5:302018-12-11T11:44:08+5:30

काँग्रेस अध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींना पहिल्याच बर्थ डेवर गिफ्ट मिळालं आहे.

'President' Rahul Gandhi's Birthday 'Happy'; Three States Congress leading | 'अध्यक्ष' राहुल गांधींचा बर्थ डे 'हॅप्पी'; तीन राज्यं काँग्रेसच्या 'हाती'

'अध्यक्ष' राहुल गांधींचा बर्थ डे 'हॅप्पी'; तीन राज्यं काँग्रेसच्या 'हाती'

Next

नवी दिल्ली- गेल्या वर्षी याच दिवशी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली होती. अध्यक्षपदी विराजमान झाल्याच्या कार्यकाळाला आज एक वर्षं पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे आजच पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. काँग्रेसला पाच राज्यांपैकी तीन राज्यांत सरकार बनवण्यासाठी बहुमत मिळत असल्याचं चित्र समोर आलं आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. त्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का समजला जातोय. तर राजस्थानमध्येही मतदारांनी वसुंधरा राजेंना कात्रजचा घाट दाखवला आहे.

तिन्ही राज्यांत भाजपाला लाजिरवाण्या पराभवाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना लोकसभेच्या निवडणुकीची सेमी फायनल समजलं जातं. अशातच काँग्रेस अध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींना पहिल्याच बर्थ डेवर गिफ्ट मिळालं आहे. काँग्रेसचे 60वे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी 11 डिसेंबर 2017ला निवड झाली. परंतु त्याची औपचारिक घोषणा 16 डिसेंबर 2017ला झाली आहे. राहुल गांधी हे गांधी-नेहरू परिवारातील सहावे आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे 17वे प्रमुख आहेत.








 

Web Title: 'President' Rahul Gandhi's Birthday 'Happy'; Three States Congress leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.