नवी दिल्ली : नवी दिल्लीतील आगीच्या दुर्घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारण्यासाठीही या मान्यवरांनी प्रार्थना केली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर खूप दु:ख झाले. स्थानिक प्रशासनाकडून पीडितांना सर्व मदत केली जात आहे. मृतांच्या कुटुंबियांना या परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती मिळावी आणि जखमींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो.- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
४० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने अतिशय दु:ख झाले. मृतांच्या कुटुंबियांबाबत सहवेदना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जखमींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो.
- व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती
या भीषण दुर्घटनेत अनेकांनी नातेवाईक गमावले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्याचप्रमाणे जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारणे असा विश्वास वाटतो. दुर्घटना घडलेल्या भागात आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आगीच्या दुर्घटनेत अनेकांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तसेच, जखमी झालेल्यांची प्रकृती सुधारण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
आगीच्या दुर्घटनेमध्ये अनेकांना जीव मगवावा लागला याचे अतशिय दु:ख आहे. या दु:खद घटनेत मी पीडित कुटुंबियांसोबत आहे. जखमींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो.
- राजनाथसिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री
या दुर्घटनेच्या संपूर्ण तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तपासानंतर आगीचे खरे कारण स्पष्ट होईल. दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री
आगीत अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला याचे अतिशय दु:ख आहे. सर्व पीडितांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वेतोपरी मदत मिळेल. काँग्रेस नेत्यांकडूनही सर्व मदत करण्यात येईल.
- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष
मृतांच्या कुटुंबियांसाठी सहवेदना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दुर्घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो.
- राहुल गांधी, खासदार, काँग्रेस