शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

Presidential Election 2022: कशी होते राष्ट्रपतींची निवडणूक? खासदार-आमदारांच्या मतांचे मूल्य काय? असे आहे गणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 12:23 PM

Presidential Election 2022: गेल्या वेळेस 17 जुलै 2017 ला राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती. तेव्हा जवळपास 50 टक्के मते एनडीएच्या बाजूने पडली होती.

Presidential Election 2022: राज्यसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर लागले आहे. निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करेल. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपत आहे.

17 जुलै 2017 रोजी शेवटची राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती. तेव्हा जवळपास 50 टक्के मते एनडीएच्या बाजूने पडली होती. एकूण 4,880 मतदारांपैकी 4,109 आमदार आणि 771 खासदारांनी मतदान केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग नसतो. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी यात मतदान करतात. जाणून घेऊन या निववणुकीचे गणित...

राष्ट्रपतीपदाची निवडणूक अशी होतेराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या मतांच्या किमतीचे गणित वेगळे असते. सर्व प्रथम, सर्व राज्यांच्या विधानसभाच्या आमदारांच्या मतांचे मूल्य जोडले जाते. या एकत्रित मूल्याला राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. अशा प्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचे मूल्य असते.

खासदार-आमदारांच्या मतांचे मूल्यदेशात एकूण 776 खासदार आहेत (लोकसभा आणि राज्यसभेसह). प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 आहे. देशात एकूण 4120 आमदार आहेत. प्रत्येक राज्याच्या आमदाराच्या मताचे मूल्य वेगळे असते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशच्या एका आमदाराच्या मताचे मूल्य 208 आहे. आमदाराच्या बाबतीत, ज्या राज्यात आमदार आहे तिथली लोकसंख्या पाहिली जाते. यासोबतच त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्याही विचारात घेतली जाते. मूल्य मोजण्यासाठी, राज्याची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येने भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला 1000 ने भागले जाते. आता जो आकडा उपलब्ध आहे तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य आहे.

असा ठरतो विजयराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळणे हे विजय निश्चित करत नाही. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे वेटेज प्राप्त करणारा राष्ट्रपती होतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांच्या मतांचे एकूण वेटेज 1098882 आहे. उमेदवाराला विजयासाठी 549441 मते मिळणे आवश्यक आहे.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूकRamnath Kovindरामनाथ कोविंद