शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
2
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
3
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
6
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
7
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
8
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
9
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
10
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
11
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
12
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
13
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
14
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
15
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
16
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
17
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
18
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
19
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
20
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'

Presidential Election 2022: जाणून घ्या, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची मोजणी कशी केली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:45 AM

सर्व प्रथम मतांची छाननी करून ती क्रमवारीने लावली जाते. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी या मतपत्रिकांची छाननी करतील.

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर २५ जुलैला देशाचे नवे राष्ट्रपती शपथ घेतील. नवे राष्ट्रपती कोण असतील याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. यासाठी दोन उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आहेत. त्याचवेळी विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. संसद भवनच्या मुख्य इमारतीत सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ६३ देण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मत मोजण्याची एक निश्चित पद्धत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

सर्व प्रथम मतांची छाननी करून ती क्रमवारीने लावली जाते. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी या मतपत्रिकांची छाननी करतील. बॅलेट पेपरमध्ये खासदार त्यांच्या पसंतीनुसार उमेदवारांना मतदान करतात. यासाठी ते हिरवे पेन वापरतात. याउलट आमदार गुलाबी पेनाचा वापर करतात. अशा प्रकारे, द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्या बाजूने पडलेली मते वेगळी केली जातील.

दोन स्वतंत्र ट्रे मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र ट्रे ठेवण्यात आले आहेत. यातील एक एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी आहे. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी दुसरी ट्रे आहे. खासदारांपूर्वी आमदारांच्या मतपत्रिका क्रमाने लावल्या जातील. मुर्मू यांचे नाव असलेली मतपत्रिका त्या ट्रेमध्ये ठेवली जाईल. तर यशवंत सिन्हा यांना पसंती दिली असती तर त्यांना दुसऱ्या ट्रेमध्ये स्थान मिळेल. प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचे मूल्य ठरलेले असते. खासदाराच्या मताचे मूल्य ७०० आहे. त्याच वेळी, आमदाराच्या मताचे मूल्य त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.

मतमोजणीनंतर ट्रेंड येण्यास सुरुवात मतपत्रिकांची क्रमवारी लावल्यानंतरच मतांची मोजणी केली जाते. संसदेतील खोली क्रमांक ७३ बाहेर मीडिया स्टँड बनवण्यात आला आहे. मतमोजणी सुरू होताच कल कळविला जाईल. हे समजून घ्यायला हवं की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार हा विजयी नसतो. मात्र, ठराविक कोट्यापेक्षा जास्त मते मिळविणारा विजयी आहे. प्रत्येक उमेदवाराचा कोटा टाकलेल्या मतांची बेरीज करून, दोनने भागून आणि त्यात '१' जोडून कोटा निश्चित केला जातो. या मूल्यापेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022Presidentराष्ट्राध्यक्ष