राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच, भाजपने येथे पोस्टरबाजी सुरू केली आहे. या पोस्टरवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदिवासी विरोधी असल्याचे म्हटले आहे. या पोस्टरवर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टीएमसीने यशवंत सिन्हा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या पोस्टरवर पुढे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यात म्हण्यात आले आहे, की ममता बॅनर्जी आदिवासी समाजातील उमेदवाराचे समर्थन न करता, दुसऱ्याचेच समर्थन करत आहे. त्या आदिवासी समाजाच्या जवळ येण्यास कचरत आहेत. ही भिन्नता होती आणि राहील ही.
आपचाही यशवंत सिन्हा यांना पाठींबा -अरविंद केजरिवाल यांच्या आपने विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी दिल्ली आणि पंजाबची ताकद युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामागे उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपच्या पॉलिटिकल अफेअर कमिटीच्या बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.