21 Jul, 22 07:47 PM
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. तिसऱ्या फेरी अखेर मुर्मू यांना ८१२ मतं मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना ५१२ मतं मिळाली आहेत.
21 Jul, 22 07:24 PM
विजयाआधीच एसपी सिंह बघेल यांनी दिल्या शुभेच्छा
21 Jul, 22 07:23 PM
मुर्मू यांचा कार्यकाळ खूप यशस्वी ठरेल
द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा काळ अत्यंत यशस्वी ठरेल असा मला विश्वास आहे, असं भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.
21 Jul, 22 06:45 PM
भाजपाचा दावा- विरोधी पक्षाच्या १७ खासदारांनी केलं एनडीएला मतदान
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे. यात भाजपाच्या सुत्रांच्या माहितीनुसार मुर्मूंना ५२३ मतं मिळण्याची अपेक्षा होती. पण मुर्मूंना पहिल्या फेरीअखेर ५४० मतं मिळाली आहेत. यावरुनच भाजपानं विरोधी पक्षाच्या १७ खासदारांनी आमच्या बाजूनं मतदान केल्याचा दावा केला आहे.
21 Jul, 22 05:50 PM
दुसऱ्या फेरीची मतमोजणी संपली
१० राज्यांतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत द्रौपदी मुर्मू यांना १३४९ मतं पडली आहे. तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली आहेत.
21 Jul, 22 05:43 PM
नव्या राष्ट्रपतींसाठी डिनरचं आयोजन करणार कोविंद
२४ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळासाठी डिनरचं आयोजन करणार आहेत. राष्ट्रपती भवनात रात्री सात वाजता डिनर होणार आहे.
21 Jul, 22 04:55 PM
गजेंद्र शेखावत द्रौपदी मुर्मूंच्या भेटीला पोहोचले
द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी निकाल येण्याआधीच जल्लोषाला सुरुवात झाली आहे. यात अनेक नेत्यांच्याही भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अनिल बलूनी यांच्यानंतर आता गजेंद्र शेखावत देखील द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आहेत.
21 Jul, 22 04:00 PM
द्रौपदी मुर्मू आघाडीवर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान य़ांनी लोककलाकारांमध्ये सहभागी होत साजरा केला आनंद
21 Jul, 22 03:14 PM
राष्ट्र इतिहास घडवणार, द्रौपदी मुर्मू विजयी होणार
राष्ट्र इतिहास घडवणार आहे. १५ व्या राष्ट्रपतींची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. कोणाच्या मनात शंका नाही. ओडिशातील एका अतिशय सामान्य घरातून आलेल्या आदिवासी कुटुंबातील मुलगी, द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होईल - केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
21 Jul, 22 02:57 PM
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष
ओडिशा येथे SLS (श्याम, लक्ष्मण आणि सिपुन) मेमोरियल रेसिडेन्शिअल स्कूल, पहाडपूर येथे विजयाचा उत्सव सुरू झाला, या शाळेची स्थापना एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे पती आणि 2 मुलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
21 Jul, 22 02:41 PM
NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आघाडीवर
द्रौपदी मुर्मू यांना ३,७८,००० मुल्य असणारी ५४० मते मिळाली आहेत आणि यशवंत सिन्हा यांना १,४५,६०० ची २०८ मते मिळाली आहेत. एकूण १५ मते अवैध ठरली. - पीसी मोदी, महासचिव, राज्यसभा
21 Jul, 22 02:41 PM
मतमोजणीचा पहिला कौल लवकरच समोर येणार
निवडणूक आयोगानुसार यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ४७९६ मतदार होते, त्यापैकी ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये १०० टक्के मतदान झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्ली आणि पुद्दुचेरीसह ३० ठिकाणी मतदान झाले. या निवडणुकीत, राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांव्यतिरिक्त, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार होता.
21 Jul, 22 02:18 PM
निकालापूर्वीच मुर्मू यांच्या गावी विजयाचा जल्लोष
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी ओडिशातील रायरंगपूर गावात उत्सव सुरू झाला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
21 Jul, 22 01:51 PM
पहिल्या खासदारांच्या मतांची मोजणी
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पहिल्या खासदारांची मते मोजली जातात. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजपने केला आहे.
21 Jul, 22 12:54 PM
राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया
राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया संसदेत सुरू झाली आहे. मतमोजणीत सुरुवातीला मतांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर ती दोन वेगळ्या ट्रे मध्ये ठेवण्यात येतील.
21 Jul, 22 12:44 PM
संसद भवनातील खोली क्रमांक ६३ 'सायलेंट झोन'
नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसद भवनात मतमोजणी सुरू आहे. संसद भवनातील खोली क्रमांक ६३ मध्ये मतमोजणी सुरू असून मतमोजणीनंतर लवकरच निकाल जाहीर होणार आहे. खोली क्रमांक ६३ चा तात्काळ परिसर निर्जंतुक करण्यात आला आहे आणि "सायलेंट झोन" म्हणून घोषित करण्यात आला आहे.
21 Jul, 22 12:42 PM
द्रौपदी मुर्मू यांनी स्वत:ला सिद्ध केलं, घरच्यांनी जागवल्या आठवणी
महिला काहीही साध्य करू शकतात हे द्रौपदी मुर्मू यांनी सिद्ध केले. त्यांच्या मूळ गावी रायरंगपूर येथील नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी मुर्मू यांच्या मूळ गावी रायरंगपूरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. मुर्मू यांच्या मावशी सरस्वती म्हणाल्या, 'आमच्या काळात आम्हा मुलींना नेहमी सांगितले जायचे की तू अभ्यास करून काय करशील. लोक तिला विचारायचे की ती काय करू शकेल. आता ती काय करू शकते हे तिने सिद्ध केले आहे.
21 Jul, 22 11:29 AM
मुर्मू यांच्या विजयाचा विश्वास, भाजपा काढणार रोड शो
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला विजयाचा विश्वास आहे. पक्षानेही विजयी मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे. एवढेच नाही तर द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ३ किमी रोड शो करणार आहेत. या कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत.
21 Jul, 22 11:23 AM
"देशातील प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना"
आदिवासी समाजातून पुढे आलेल्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून देशातील प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना आहे. सर्व प्रमुख आदिवासी नेते नवीन राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी दिल्लीत येणार आहेत - केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू
21 Jul, 22 10:24 AM
निकालानंतर पंतप्रधान मोदी द्रौपदी मुर्मू यांच्या घरी जाणार
राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालानंतर दुपारी अडीच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.
21 Jul, 22 09:56 AM
राष्ट्रपती मतमोजणीची संसदेत तयारी
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ११ वाजता सुरू होणार असून, संसदेत तयारी सुरू आहे
21 Jul, 22 08:56 AM
द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी विजयोत्सवाची तयारी
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड असल्याने मतमोजणी त्या विजयी होतील असं मानलं जात आहे. अपेक्षित निकाल लागला मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. दुसरीकडे, द्रौपदी मुर्मू यांचे मूळ गाव ओडिशातील रायरंगपूरमध्येही विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. येथे निकाल लागल्यानंतर मिठाई वाटण्यात येणार आहे. रायरंगपुरात लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर विजयानंतर मुर्मू यांची विजयी मिरवणूक काढण्याची तयारीही करण्यात आली आहे. भाजपाचे स्थानिक नेते तपन महंता यांनी सांगितले की, २० हजार लाडू बनवले जात आहेत. १०० बॅनरही करण्यात आले आहेत.