Presidential Election: पुढील महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential Election) होणार आहे. एनडीएने द्रौपदी मूर्मू(Draupadi Murmu) आणि यूपीएने यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, या निवडणुकीवरुन काँग्रेस नेले राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलीये. राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही दोन व्यक्तींमधील लढत नसून दोन भिन्न विचारसरणींमधील लढा असल्याचे ते म्हणाले.
आमचा यशवंत सिन्हांना पाठिंबाराहुल गांधी पुढे म्हणाले, 'आम्ही सर्वजण मिळून यशवंत सिन्हाजींना पाठिंबा देत आहोत. अर्थात आम्ही एका व्यक्तीला पाठिंबा देत आहोत पण खरी लढाई दोन विचारधारांमध्ये आहे. एकीकडे राग, द्वेषाची विचारधारा आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांची बंधुभावाची विचारधारा आहे. संपूर्ण विरोधक सिन्हा यांच्या पाठीशी उभे आहेत,' असेही ते म्हणाले.
ही विचारधारेची लढाई- तृणमूल काँग्रेसतृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय म्हणाले, 'ही दोन व्यक्तींमधील लढाई नाही, तर ती विचारसरणीची लढाई आहे. हा जातीयवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षता असा लढा आहे. मला वाटते यशवंत सिन्हा हे सर्वोत्तम उमेदवार आहेत. काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राजद आणि इतर अनेक विरोधी पक्ष सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. ही देशाच्या सर्वोत्तम मूल्यांची सर्वसमावेशक युती आहे.' मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले, 'हा अस्मितेच्या राजकारणाचा प्रश्न नाही. आम्ही द्रौपदी मुर्मूजींचे आभार मानतो, पण ही विचारधारेची लढाई आहे.'
द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होतायशवंत सिन्हा यांनी सोमवारी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 18 जुलै रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.