शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 1:34 PM

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण असावा? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली. यामुळे आता विरोधक आणि सत्ताधारी या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. असे असताना महाराष्ट्रातून काँग्रेसने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसविरोधात तिसरी आघाडीची मोट बांधण्यात पवारांसोबत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली आहे. 

या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण राहील? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आप नेते खासदार संजय सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.  खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

याचवेळी ममता यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपाविरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये दिल्लीत १५ जूनला ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे म्हटले आहे. टीएमसीने पाठविलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीमुळे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी तीन वाजता विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली असल्याचे म्हटले आहे. येचुरी यांच्यानुसार जर आधीच एक बैठक ठरलेली असेल तर शरद पवार ममतांच्या बैठकीला उपस्थित राहू शकतील की नाही हे देखील समजणार आहे. 

ममता यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र करण्याचा 'एकतर्फी' प्रयत्न नुकसानच करणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची १५ जून रोजी होणारी बैठक आधीच ठरलेली आहे, असे येचुरी यांनी म्हटले आहे. 

तर ममता यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहू शकणार नाहीत. आम्हाला ममता यांचे पत्र मिळाले आहे. परंतू आम्ही तेव्हा अयोध्येमध्ये असणार आहोत. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. या बैठकीला आमचा एक ज्येष्ठ नेता पाठवू, असे राऊत म्हणाले आहेत. 

विरोधकांची एकी? - राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून विरोधकांमध्ये एकमत होणार काय? याबद्दल अद्यापही ठोस काहीही सांगता येत नाही. विरोधकांची एकी हाेऊनउमेदवारावरून एकमत व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु काँग्रेसच्या पुढाकारात आप, टीआरएस व टीएमसी पक्ष एकत्र येतील काय? हा मुख्य प्रश्न आहे. - टीएमसीचे लोकसभेत २३ व राज्यसभेत १३ सदस्ये आहेत. टीआरएसचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत ७ सदस्य आहेत. यापूर्वी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या बोलाविलेल्या अनेक बैठकांना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावलेली नाही.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीPresidentराष्ट्राध्यक्ष