ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना मीरा कुमार यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित होत्या. मात्र यावेळी उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर होते. सुट्टीवर असलेल्या राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून मीरा कुमार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होण्याचा निर्णय घेतला असताना जेडीयूने मात्र एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. मीरा कुमार यांना एकूण 17 पक्षांचं समर्थन असल्याचा दावा केला जात आहे.
राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज बुधवार शेवटचा दिवस आहे. मंगळवारपर्यंत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासहित 64 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Against the ideology of divisiveness she represents the values that bind us as a nation&a ppl.Proud to have @meira_kumar ji as our candidate https://t.co/R7M5udN44y— Office of RG (@OfficeOfRG) June 28, 2017
मीरा कुमार यांनी जेव्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ज्येष्ठ काँग्रेस नेता मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. हे सर्व नेता पहिल्या रांगेत खुर्च्यावर बसलेले दिसत होते. याशिवाय समाजवादी पक्षाकडून नरेश अग्रवाल, बीएसपीकडून सतीश मिश्रा, डाव्यांकडून सिताराम येचुरींसारखे नेतेही उपस्थित होते.
Opposition Presidential candidate #MeiraKumar files her nomination pic.twitter.com/MGc1LJYmFo— ANI (@ANI_news) June 28, 2017
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याशिवाय सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि ज्येष्ठ काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला आणि राजीव शुक्लाही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मीर कुमार यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी आणि समता स्थळावर जाऊन आपले वडिल स्वर्गीय जगजीवन राम यांना श्रद्धांजली वाहिली.
मीरा कुमार यांच्याबद्दल थोडंसं -
- माजी उपपंतप्रधान स्व. जगजीवन राम यांच्या कन्या.
- बिहारच्या आरा जिल्ह्यात १९४५ साली जन्म.
- डेहराडून, जयपूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण.
- दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी. डॉक्टरेटही मिळवली.
- त्या भारतीय परराष्ट्र सेवेत होत्या.
- सलग पाच वेळा लोकसभेवर
- पहिल्या महिला लोकसभाध्यक्ष होत्या. लोकसभाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
- २00४ ते २00९ या काळात सामाजिक न्यायमंत्री. काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणूनही काम केले.
- मीरा कुमार यांचे पती मंजुळ कुमार पेशाने वकील. वडिलांच्या नावावर नव्हे, तर आपल्या कामाच्या आधारे त्यांनी राजकारणात स्वत:चा ठसा उमटविला.