ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २५ - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारसीनंतर राजकीय अस्थैर्य अनुभवत असलेल्या अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी या आदेशावर सही केल्याचे वृत्त आहे. मात्र या या निर्णयाची अरुणाचलमधील सत्ताधारी काँग्रेसने तीव्र शब्दांत निंदा केली असून ही राजकीय असहिष्णुता असल्याचा आरोप केला आहे.
'हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्राने एकदाही राज्य सरकारशी चर्चा केली नसून हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे' अशी प्रतिक्रिया अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी व्यक्त केली आहे. 'अरूणाचल प्रदेश हा अतिशय शांत भाग असून कायदा व सुव्यवस्थेला धक्का बसल्याची एकही घटना गेल्या महिन्याभरात घडलेली नाही', असेही ते म्हणाले. 'हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असताना केंद्राने एवढ्या घाईने हा निर्णय घेण्याची काय गरज होती असा सवाल विचारत हा निर्णय अतिशय चुकीचा व सूडबुद्धीने घेण्यात आला आहे' अशी टीकाही तुकी यांनी केली.
काल (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. गतवर्षी १६ डिसेंबरला अरुणाचल प्रदेशात राजकीय संकट चालून आले. काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांनी भाजपाचे ११ आणि दोन अपक्ष आमदारांना सोबत घेऊन एका अस्थायी ठिकाणी अधिवेशन भरवत, विधानसभाध्यक्ष नबाम रेबिया यांच्यावर ‘महाभियोग’ चालवला होता. अखेर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या आदेशावर सही केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
This is really shocking as the Centre did not consult the state government before taking such a harsh decision.#ArunachalPradesh@INCIndia— Nabam Tuki (@NabamtukiCM) January 25, 2016
Never president's rule is imposed in #Arunachal . This is a wrong decision and politically motivated. @INCIndia@OfficeOfRG— Nabam Tuki (@NabamtukiCM) January 25, 2016
Raj Bhawan is now a BJP HQ, Governor acting as BJP's agent- V Narayanasamy,Congress on #ArunachalPradeshpic.twitter.com/r7laJAfoID— ANI (@ANI_news) January 25, 2016