नवी दिल्ली : राजकीय अस्थैर्य अनुभवत असलेल्या अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केली. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची अरुणाचलमधील सत्ताधारी काँग्रेसने तीव्र शब्दांत निंदा केली असून ही राजकीय असहिष्णुता असल्याचा आरोप केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली गेली. गतवर्षी १६ डिसेंबरला अरुणाचल प्रदेशात राजकीय संकट चालून आले. काँग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांनी भाजपाचे ११ आणि दोन अपक्ष आमदारांना सोबत घेऊन एका अस्थायी ठिकाणी अधिवेशन भरवत, विधानसभाध्यक्ष नबाम रेबिया यांच्यावर ‘महाभियोग’ चालवला होता.
अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट?
By admin | Published: January 25, 2016 1:57 AM