अहमदाबाद : गुजरात निवडणुकीचे वातावरण तापू लागताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिकाधिक वेळ आपल्या गृहराज्यात व्यतित करू लागले आहेत. भाजपच्या निवडणूक रणनीतीचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. उमेदवारांची नावे अंतिम करणे, बंडखोरांना चुचकारणे यासह विविध आघाड्यांवर ते काम करत आहेत. गेले चार दिवस ते राज्यात तळ ठोकून असले तरी त्यांचा बहुतांश वेळ अहमदाबाद व गांधीनगरसाठी खर्ची झाला. गांधीनगर हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. तेथून पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे.
या जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पक्षाने तिकिटे नाकारली. दगाफटका होऊ नये म्हणून या मतदारसंघात शहा यांनी रात्री उशिरा बैठका घेतल्या. गांधीनगरमधील सात जागांपैकी पाच जागा भाजपकडे तर दोन जागा काँग्रेसकडे आहेत. यावेळी सातही जागा निवडून आणण्याची शहा यांची रणनीती आहे. त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई बनल्याने ते येथे लक्षणीय वेळ देत आहेत.
अमरेलीत भाजप लावणार जोरपाटीदारबहुल अमरेली जिल्हा एकेकाळी भाजपचा गड होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने येथे भाजपची धूळधाण केली होती. भाजपला पाचपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. यावेळी भाजप जिल्ह्यातील काही जागा जिंकून आपली प्रतिष्ठा वाचविण्याचा प्रयत्न करेल. २०१७ च्या निवडणुकीत पाटीदारबहुल अमरेली जिल्ह्यात भाजपला मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस केवळ तीन जागा लढवणार- गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तेथे अवघ्या ३ जागा लढविणार आहे. - २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये ५८ जागा लढविल्या होत्या तेव्हा पक्षाची काँग्रेससोबत आघाडी नव्हती. - केवळ एकाच ठिकाणी पोरबंदर येथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. - राकाँने नरोडात काँग्रेसच्या नगरसेवकाला तिकीट दिले होते. मात्र, त्याने निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे पक्ष दुसरा उमेदवार उभा करणार आहे.
काँग्रेसच्या काळात अयोध्येत राम मंदिराची उभारणी किंवा कलम ३७० हटविणे शक्य झाले असते का ? - योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, यूपी