नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 7क् रुपयांच्या सुधारणोसह 27,3क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सणासुदीच्या मागणीने सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली आहे. दुसरीकडे चांदीचा भावही औद्योगिक संस्था व नाणो निर्मात्यांच्या मागणीने 65 रुपयांनी वधारून 39,6क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
बाजार विश्लेषकांच्या मते, सराफा बाजारात सणासुदीच्या खरेदीने तेजीचा कल दिसून आला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर झाल्याने सोन्याची आयात वाढली. यामुळेही सोन्याचा भाव वधारला.
दिल्ली बाजारातच 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 7क् रुपयांनी वाढून अनुक्रमे 27,3क्क् व 27,1क्क् रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेला. यात गेल्या सत्रत 32क् रुपयांची घसरण झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,2क्क् रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव 65 रुपयांनी उंचावून 39,6क्क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 39,17क् रुपयांवर कायम राहिला. चांदीच्या भावात काल 365 रुपयांची घट झाली होती. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 69,क्क्क् रुपये व विक्रीकरता 7क्,क्क्क् हजार रुपये प्रतिशेकडय़ावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)