राफेल विमानांची किंमत सांगा मोदीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:19 AM2018-02-08T04:19:32+5:302018-02-08T04:19:56+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली आणि जुनेच मुद्दे भाषणातून पुन्हा पुन्हा ऐकवू नका, असे सुनावले.

Price of Raphael Aircraft Modiji | राफेल विमानांची किंमत सांगा मोदीजी

राफेल विमानांची किंमत सांगा मोदीजी

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली आणि जुनेच मुद्दे भाषणातून पुन्हा पुन्हा ऐकवू नका, असे सुनावले.
मोदी लोकसभेत तब्बल दीड तास बोलत होते. पण संपूर्ण भाषणात त्यांनी राफेल विमाने भारताने केवढ्याला विकत घेतली, याचे उत्तर दिले नाही. देशातील शेतकºयांच्या स्थितीवर त्यांनी शब्द उच्चारला नाही आणि तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाबद्दलही ते काहीच बोलले नाही.
काँग्रेसने देशाची फाळणी केली, या मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना राहुल म्हणाले की, आज देशात केवळ काँग्रेस व जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच लोकशाही टिकून आहे, हे लक्षात ठेवावे. पंतप्रधानांनी वाटल्यास इतिहास बारकाईने वाचावा. राफेल विमानांची किंमत विचारताच संरक्षणमंत्री गुप्ततेचे कारण सांगतात, देशहिताचा विषय काढतात. राफेर विमानांच्या किंमती गुप्त ठेवण्याचे कारणच काय?
।मल्लिकार्जुन खडगे यांचा हल्लाबोल
काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खडगे यांनीही मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदी माझ्यावर सतत टीका करीत होते. लोकसभेत बसलेले सारे सदस्य कर्नाटकातील आहेत, असे समजून मोदी बोलत होेते. कर्नाटकात निवडणुका जिंकू पाहणारे मोदी व त्यांचा पक्ष राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळ्याबद्दल का बोलायला तयार नाहीत? या विमानांची किंमत तिप्पट कशामुळे झाली? जे कंत्राट सरकारी उपक्रमाला मिळणार होते, ते एका खासगी कंपनीला, विशिष्ट उद्योगपतीला का देण्यात आले? या साºयांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यायला हवीत.
।लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्या!
मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर ज्या पद्धतीने टीका केली, त्यामुळे संतापलेले राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी भलतेच विषय काढून लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यावरून दूर हटवण्याची
सवयच आहे. आपण पंतप्रधान आहोत,
हेही त्यांच्या लक्षात राहत नाही. सतत विरोधकांवर टीका करणे हे सरकारचे काम नसून, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण जनतेला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, त्याबाबत ते गप्पच राहतात. जाहीर सभांमध्ये त्यांनी आमच्यावर अवश्य टीका
करावी. पण संसदेची प्रतिष्ठा त्यांनी ठेवायला हवी.
तिथे त्या पद्धतीने वागायला हवे.
।सोनिया गांधी यांचीही टीका
सोनिया गांधी यांनी मोदी यांच्या भाषणावर सडकून टीका केली. पंतप्रधानांच्या भाषणात एकही गोष्ट नवी नव्हती, एक ते दीड तास ते सतत जुन्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत होते. लोकांना त्यात रस नाही. तरुणांना रोजगार व भवितव्य याची चिंता आहे. पण त्याविषयी मोदी बोलायलाच तयार नाहीत.

Web Title: Price of Raphael Aircraft Modiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.