शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

मोठा दिलासा! खाद्य तेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या नेमकं किती स्वस्त झालं तेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:50 PM

Edible Oil Rate: खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Edible Oil Rate: खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या कर कपातीच्या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. याशिवाय घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घाण्यासाठीही सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. देशात आठ प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Prices of edible oils fall know how cheap mustard oil and other know the Details)

केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात १४ सप्टेंबर रोजी शेंगतेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लावर, पाम तेल, नारळ तेल आणि तिळाच्या तेलाच्या किमतीत घट नोंदविण्यात आली आहे. १४ सप्टेंब रोजी पाम तेलाचा दर २.५० टक्क्यांच्या घटीसह १२,३४९ रुपये प्रतिटन इतका नोंदवला गेला. एका आठवड्यापूर्वी हाच दर १२, ६६६ रुपये इतका होता. 

तिळाच्या तेलाच्या दरात २.०८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर नारळ तेल १.७२ टक्क्यांनी स्वस्त झालं आहे. सनफ्लावर ऑइलचा १४ सप्टेंबर आधी १६,१७६ रुपये प्रतिटन इतका होता. आता त्यात १.३० टक्क्यांची घट झाली असून १५,९६५ रुपये प्रतिटन इतका झाला आहे. तेलाच्या घाऊक दरात झालेल्या घटीचे पडसाद किरकोळ बाजारातही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. 

नियंत्रण आणि नजर ठेवण्यासाठी वेब पोर्टलतेलाची साठेबाजी टाळण्यासाठी आणि मागणीची पूर्तता होण्यासाठी केंद्रानं खाद्य तेलाच्या आयात शुल्कात कपातीचा निर्णय घेतला होता. तसंच साठेबाजीला आळा घालण्यासाठी देखील अनेक महत्त्वाची पावलं सरकारनं उचलली आहेत. यात तेल निर्मात्या कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्या जवळील तेलाच्या स्टॉकची माहिती एका वेब पोर्टलवर नोंद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय घाऊक विक्रेत्यांना तेलाच्या किमती स्पष्ट स्वरुपात दिसतील अशा पद्धतीनं जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार खरेदी करता येईल. 

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पbusinessव्यवसाय