नवी दिल्ली - नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. इंडेन गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. आजपासून ही वाढ लागू झाली आहे. याआधी 1 जानेवारी रोजी बजेट मांडण्यापूर्वी गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या होत्या. कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली होती.
दिल्लीमध्ये 14 किलो गॅस सिलिंडर 858.50 रुपयांना मिळणार असून त्याच्या किंमतीत 144.50 रुपयांची वाढ करण्यात आले आहे. कोलकातामध्ये सिलिंडरच्या किंमतीत 149 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता ती 896 रुपये असणार आहे. तर मुंबईकराना गॅस सिलिंडरसाठी 829 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत गॅसच्या किंमतीत 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ करण्यात आली असून 881 रुपये द्यावे लागणार आहेत.
दरमहिना सबसिडी आणि बदलत जाणाऱ्या बाजार भावानुसार गॅसच्या किंमतीत बदल होत असतो. याआधी 1 जानेवारी 2020 रोजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या दरामध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. सरकार दरवर्षी 12 सिलिंडरवर अनुदान देते. बजेटच्या आधी कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली असून, व्यापाऱ्यांना आता व्यावसायिक सिलिंडर्ससाठी 1550.02 रुपये मोजावे लागत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
China Coronavirus : धक्कादायक! साध्या तापाला 'कोरोना' व्हायरस समजून त्याने उचललं टोकाचं पाऊल
Delhi Election Results : आपच्या आठ महिलांनी मिळवला शानदार विजय अन् पोहोचल्या विधानसभेत
दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र
Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!
Delhi Election : आपच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्याचा मृत्यू