शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

भाजीपाला वधारतोय लसूण, साखरेचे दर चढेच : डाळीच्या दरातील घसरण कायम

By admin | Published: January 23, 2017 8:13 PM

कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात थोडी वाढ झाली असून प्रमुख भाज्यांचे दर काही प्रमाणात वधारलेच दिसत आहे. लसूण, साखरेचे दर चढेच राहिले असून डाळीचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले आहेत. फळ माकेर्ेटमध्ये आवक व उठाव यात अजूनही सुधारणा न झाल्याने दर स्थिर आहेत.

कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात थोडी वाढ झाली असून प्रमुख भाज्यांचे दर काही प्रमाणात वधारलेच दिसत आहे. लसूण, साखरेचे दर चढेच राहिले असून डाळीचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले आहेत. फळ माकेर्ेटमध्ये आवक व उठाव यात अजूनही सुधारणा न झाल्याने दर स्थिर आहेत.
दोन महिने भाजीपाल्याचे दर अक्षरश: मातीमोल झाले होते. यंदा पाऊस चांगला असल्याने उत्पादन वाढले आहे, त्यात चलन तुटवड्यामुळे सर्वच बाजारपेठा थंड झाल्याने भाजीपाल्याचे दर एकदम खाली आले. गेले आठवड्याच्या तुलनेत सध्या भाजीपाल्याचे दर काहीसे बरे आहेत. कोबी, वांगी, ढब्बू, गवार, कारली, भेंडीचे दर वधारले आहेत. टोमॅटोचा दर चार रुपये किलो होता. त्यात सुधारणा होऊन सध्या दहा रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ओली मिरचीच्या दरातही थोडी वाढ झाली असून घाऊक बाजारात ३० रुपयांपर्यंत किलोचा दर आहे. गावठी वरणा येत असल्याने दरात थोडी घसरण दिसत असली तरी ४० रुपयांपर्यंत दर स्थिर राहिला आहे. फ्लॉवरची आवक वाढतच आहे, परिणामी दरात सुधारणा झालेली नाही. किरकोळ बाजारात दहा रुपयाला मोठा गड्डा मिळत आहे.
डाळींच्या दरात घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात ८५ तर हरभरा डाळ शंभर रुपये दर राहिला आहे. मूग, मूगडाळ, उडिदडाळीचे दर स्थिर असून साखरेच्या दर मात्र हळू-हळू वाढू लागले आहेत. फळ मार्केटमध्ये फळांची आवक चांगली आहे. माल्टा, संत्री, द्राक्षे, सफरचंद, बोरांची आवक मोठ्या प्रमाणात आहे, पण उठाव होत नसल्याने दर स्थिर आहेत. स्ट्रॉबेरीची आवकही हळू-हळू वाढू लागली आहे.
कांद्याची आवक कमी
गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. घाऊक बाजारात १५ ते ९० रुपये दहा किलोपर्यंत दर असला तरी सरासरी दरात ५ रुपयांची वाढ दिसत आहे. बटाट्याचे मात्र स्थिर आहेत.
----------------------------------------------------
गूळ चांगलाच तेजीत
गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी आठवड्याला दरात वाढ होत आहे. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ४५०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. एक किलो बॉक्सचा दर ५५०० रुपये झाला आहे.
------------------------------------------------
खाद्यतेलाचे प्रतिकिलोचे दर असे :-सरकी तेल-८२, सूर्यफूल-९०, शेंगतेल-१४० रुपये
-------------------------------------------------------
फळांचे दर असे : संत्री -५०, मोसंबी-६०, डाळींब-५०, सफरचंद-७०,द्राक्षे-५० ते ७०, बोरे -२० रुपये.
-----------------------------------------------------------------
(राजाराम लोंढे) (फोटो उपलब्ध झाल्यास देतो......)