नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करण्यात व्यस्त, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 06:38 PM2019-02-28T18:38:00+5:302019-02-28T18:39:01+5:30
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याची गरज होती त्याचवेळी मोदी हे भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. देशाला मजबूत करण्याची वेळ आलेली असताना मोदी मात्र बूथ मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ''पक्षा पेक्षा देश मोठा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमधून वारंवार सांगत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांची वर्तणूक ही पक्ष देशापेक्षा मोठा असल्यासारखी आहे. सध्या देशातील वातावरण हे राजकारणापेक्षा देशभक्तीमय झालेले आहे अशावेळी देशाला संबोधित करण्यापेक्षा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणे मोदींना का गरजेचे वाटले, हा एक प्रश्नच आहे.'' असे मनीष तिवारी म्हणाले. तसेच ज्या दिवशी भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केले त्याच दिवशी भाजपा अध्यक्ष पंतप्रधानांसाठी मते मागत होते, ही वेळ काय राजकारण करण्याची आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
Manish Tewari, Congress: At this point in time when the nation is looking towards its leadership, when the nation wants its leadership to speak to it, the Prime Minister chose to address the booth workers of the BJP rather than address the nation. pic.twitter.com/BNJrKVU0jC
— ANI (@ANI) February 28, 2019
यावेळी मनीष तिवारी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला. ''भाजपाचे कर्नाटकमधील अध्यक्ष या कारवाईमुळे राज्यात भाजपाला 28 पैकी 22 जागा मिळतील, असा दावा करत आहेत. तर गिरिराज सिंह म्हणताहेत की 3 मार्चच्या एनडीएच्या सभेत जो सहभागी होणार नाही त्याने पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्ये पाकिस्ताच्या अपप्रचाराला मजबूत कर आहेत.'' असा आरोपही तिवारी यांनी केला.
Manish Tewari, Congress: Pakistan has been sponsoring a proxy war against India since 1979-1980. First recipient of that cross border terror using semi state actors was Punjab. For 15 long years Punjab suffered because of the terror unleashed by the ISI. pic.twitter.com/FxVbElcArW
— ANI (@ANI) February 28, 2019