नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवरील गोळीबार प्रकरणांना गांभीर्याने घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी लष्करप्रमुख जनरल बिक्रमसिंग यांच्याकडून सुरक्षा स्थिती आणि आॅपरेशनल तयारीची माहिती घेतली. पंतप्रधान आणि लष्करप्रमुख यांची बैठक जवळपास तीन तास चालली. या बैठकीत संरक्षणमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित होते. या बैठकीत अंतर्गंत सुरक्षेची स्थिती तसेच संपूर्ण सुरक्षा स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आॅपरेशनल तयारी आणि भविष्यातील आव्हानांबद्दल विचार करण्यात आला, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. ही बैठक सकाळी १० वाजता सुरू झाली आणि दुपारी १२.४० वाजता संपली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
लष्करप्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा
By admin | Published: June 14, 2014 3:15 AM