ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ट्विटरद्वारे शिवजी महाराजांना नमन केलं आहे. तारखेनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त राज्यासह देशभरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर हँडलवरुन मराठी भाषेत चार ट्वीट करत शिवरायांना नमन केले आहे. यामध्ये त्यांनी मुंबई येथे अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे भाग्य लाभले असे म्हणत हा दिवस सदैव स्मरणात राहील अशी आठवणही त्यांनी सांगितली. तर पहिल्या ट्वीटसह मोदींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. pic.twitter.com/7ywOC0GKii— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2017
छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते.— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2017
शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत.— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2017
नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील.— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2017