शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

राष्ट्रगीत सुरू असतानाही चालत राहिले पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2015 9:00 AM

राष्ष्ट्रगीत सुरू असतानाही अनावधानाने चालतच राहिल्याने रशिया दौ-या-या सुरूवातीलाच पंतप्रधान मोदींना विचित्र स्थितीचा सामना करावा लागला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - दोन दिवसांच्या रशिया दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दौ-याच्या पहिल्याच दिवशी विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. मॉस्को येथे पंतप्रधान मोदी दाखल झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी सलामी दिल्यानंतर रशियन अधिकाऱ्याने मोदींना पुढे चालण्याची सूचना दिली. मात्र ते पुढे चालत असताना त्याच क्षणी भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले. तेव्हा रशियन अधिकारी आपापल्या जागीच थांबले, पण मोदी मात्र चालतच राहिले. ते बरीच पावलं पुढे गेल्यावर एका रशियन अधिका-यांना मागून येऊन त्यांचा हात पकडून त्यांना थांबवले व पुन्हा निर्धारित जागेवर आणले. 
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करतानाच विदेशात जास्त फिरल्यामुळे पंतप्रधान मोदी राष्ट्रगीताची धूनही विसरले आहेत, अशी टीका केली.
मोदी यांचे बुधवारी रात्री उशिरा मॉस्को येथे आगमन झाले.  मोदींच्या या दोन दिवसांच्या रशिया दौ-यादरम्यान आर्थिक, अणुऊर्जा, हायड्रोकार्बन आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे करार मार्गी लागणार आहेत. हा दोन दिवसीय दौरा ऐतिहासिक असून तो छोटा असला तरी महत्वपूर्ण आहे, असे ट्विट मोदी यांनी दौ-यावर रवान होण्यापूर्वी केले. रशिया हा भारताचा जुना व घनिष्ट मित्र आहे, असेही त्यांनी नमूद केले.