ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडूमध्ये अभूतपूर्व विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवणा-या ममता बॅनर्जी व जयललिता यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगालमधील मतदारांनी तृणमूल काँग्रेसला भरघोस मतदान करून पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिल्याने पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग दुस-यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. तर अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी तामिळनाडूत निर्विवाद वर्चस्व गाजवत विरोधाकांना भुईसपाट केले आहे. दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी व जयललिता यांना फोन करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Spoken to @MamataOfficial ji & congratulated her on the impressive victory. My best wishes to her as she begins her 2nd term.
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
Had a telephone conversation with Jayalalithaa ji and congratulated her on her victory. Also conveyed my best wishes to her. @AIADMKOfficial— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
आसाममधील विजयासाठीही केले कौतुक
तसेच भाजपाने आसाममध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल व पक्ष कार्यकर्त्यांचेही अभिनंदन करत त्यांचेही कौतुक केले आहे. तसेच आसाममधील जनतेची स्वप्नं व महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करेल व राज्याचा विकासाचा मार्ग एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
Heartiest congratulations to Assam BJP Karyakartas & leaders for the exceptional win. This win is historic by all standards. Phenomenal!— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
BJP will do everything possible to fulfil dreams & aspirations of the people of Assam & take the state’s development journey to new heights.— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016