नवी दिल्ली : विदेशी पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन व्यवसाय वाढवण्यास अतुल्य भारत (इनके्रडिबल इंडिया) अभियानाचा जगभर प्रचार व प्रसार घडवण्यासाठी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने अखेर पंतप्रधान मोदींचा चेहरा निवडला आहे. अमिताभ बच्चन अथवा लोकप्रिय कलावंताला या अभियानाशी जोडण्याचा विचार मंत्रालयाने सोडून दिला. अभिनेता आमिर खान याला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून हटवल्यापासून हे पद रिक्त होते.लवकरच या प्रचार व प्रसार अभियानासाठी एजन्सीचीही निवड करण्यात येईल. ते दिड ते दोन महिने जगभर चालेल. अतुल्य भारत अभियान असे राबविणार...गेल्या अडीच वर्षात भारतात व जगातल्या विविध देशात, पंतप्रधानांनी पर्यटनाविषयी ज्या आधुनिक संकल्पना आपल्या संबोधनातून मांडल्या, भारताच्या विविधते विषयी व गुणवैशिष्ठ्यांबाबत त्यात देशातल्या अनेक पर्यटन स्थळांचा उल्लेख केला आहे. ही बाब लक्षात घेउन पंतप्रधानांच्या संबोधनाच्या आॅडिओ आणि व्हिडीओचा या अभियानाच्या जाहिरातीत आता वापर करण्यात येईल. अतुल्य भारत अभियानात विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे व्यक्तिमत्व आणि चेहरा सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. अडीच वर्षात पंतप्रधान मोदी ज्या देशात गेले, तिथल्या पर्यटकांची संख्या भारतात वाढली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने पंतप्रधान मोदींचा चेहरा अत्यंत विचारपूर्वक निवडला आहे.- महेश शर्मा, पर्यटन मंत्री
पंतप्रधान मोदीच करणार अतुल्य भारतचे ब्रँडिंग
By admin | Published: November 07, 2016 6:57 AM