उत्तर प्रदेशातील मऊ (Mau) येथे घोसी विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत जनता कुणाला विधानसभेवर पाठवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याशिवाय, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही संपूर्ण शक्ती झोकून दिल्याचे दिसत आहे. यातच, ही 2023 ची पोट निडवणूक आहे. 2024 आणि 2027 चा शंखनादच नाही, तर 2047 पर्यंतचा रोड मॅपही पंतप्रधान मोदी यांनी तयार केल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यंनी सपावर जोरदार हल्ला चढवला. घोसी पोटनिवडणुकीतील उमेदवार दारा सिंह चौहान यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना मौर्य म्हणाले, दारा सिंह चौहान यांनी सपाची विचारधारा सोडून आणि चुका सुधारून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सपाची विचारधारा घराणेशाही, दंगलवादी, जातीयवादी आणि गुन्हेगारीची आहे. यामुळे दारा सिंह चौहान यांनी सपा सोडली आहे.
2047 पर्यंतचा रोड मॅप तयार - उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, ही 2023 ची पोट निडवणूक आहे. 2024 आणि 2027 चा शंखनादच नाही, तर 2047 पर्यंतचा रोड मॅपही पंतप्रधान मोदी यांनी तयार केला आहे. सपा, बसपा आणि काँग्रेसने गरिबांना लुटून आपली तिजोरी भरली आहे. भ्रष्टाचार करून बँका भरल्या आहेत. गरिबांच्या जमिनींवर, घरांवर आणि दुकानांवर कब्जा केला आहे. मात्र, भाजप सरकार भ्रष्टाचारमुक्त, तुष्टीकरणमुक्त, घराणेशाहीमुक्त, राजकारण पुढे नेण्यासाठी संपूर्ण शक्तीने काम करत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन -केशव प्रसाद मौर्य म्हणाले, भाजप आपल्या मित्रपक्षांसह पूर्वांचलातील सर्वच्या सर्व 80 जागा जिंकेल. मऊमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येथे लोकांचा जबरदस्त उस्ताह दिसत आहे. सपाचे डिपॉझिटही जप्त होईल. विकासाच्या वेगात मऊ देखील धावू लागेल.