नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 15 व्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या (आशियान) भारत शिखर परिषदेसाठी आणि 12 व्या ईस्ट आशिया परिषदेला उपस्थितीत राहण्यासाठी आज सकाळी फिलीपीन्सला रवाना झाले. दोन्ही परिषदे व्यतिरिक्त तीन दिवसीय या दौ-या दरम्यान प्रधानमंत्री मोदी व अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची सोमवारी बैठक होऊ शकते.
या तीन दिवसीय फिलीपीन्स दौ-यात ते सोमवारी (13 नोव्हेंबर) पंतप्रधान आशियानच्या व्यवसायात आणि गुंतवणुक परिषदेला उपस्थित राहतील. यासोबतच प्रधानमंत्री मोदी फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रोडीनो डुपेरटे यांच्या सोबत द्विपक्षीय बैठकीत सामील होतील. रोडीनो हे आशियानचे विद्यमान अध्यक्ष आहेत. याच वेळी आशियानच्या 50 व्या वर्धापनदिनानिम्मित रोडीनो यांच्यातर्फे विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रंप यांच्या सोबत होऊ शकते बैठक आशिया खंडातील ५ देशाच्या यात्रे दरम्यान ट्रंप फिलिपिन्स ला सोमवारी पोहोचणार आहेत. भारत, अमेरिका, जापान व ऑस्ट्रेलिया यांचा एक संयुक्त गट तयार करण्याच्या प्रस्तावानंतर दोघांमधील हि पहिलीच बैठक असेल. प्रधानमंत्री मोदी व ट्रंप बैठकी दरम्यान क्षत्रिय सुरक्षासंबंधी विविध विषयवार चर्चा करतील.
14 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री मोदी मनिला येथील प्रादेशिक व्यापक आर्थिक सहभागाच्या बैठकीत भाग घेतील आणि आशियाई देशांच्या राष्ट्रांशी भारताचे व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढविण्यावर भर देतील. आशियान राष्ट्रांसोबत भारताचा व्यापार हा इतर देशांच्या तुलनेत 10 टक्क्यांहून अधिक आहे. मनिलामध्ये, प्रधानमंत्री मोदी इतर काही जागतिक नेत्यांची भेट घेतील, जे पूर्व आशिया शिखर सम्मेलनात सहभागी होणार आहेत.
फिलीपींसमध्ये भारतीय राजदूत यांनी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये भारतीय समाजातील सदस्यांना भेटण्याची इच्छा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. तसेच ते आंतरराष्ट्रीय तांदळाच्या संशोधन संस्था आणि महावीर फिलीपीन्स फाउंडेशनलाही भेट देणार आहेत.