नवी दिल्ली :भारताने अमेरिकेला औषधी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता. त्यावर आता पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून उत्तर दिले होते. उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानत, अशाच प्रसंगात मित्र जवळ येतात, असे म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष टम्प यांना उत्तर देताना मोदी म्हणाले, ''राषट्राध्यक्ष ट्रम्प आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. अशी वेळच मित्रांना अधिक जवळ आणते. भारत आणि अमेरिका संबंध आता पूर्वीपेक्षाही अधिक चांगले आहेत. भारत कोरोना विरोधातील मानवतेच्या लढाईत शक्य ती सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे.''
ट्रम्प यांचे ट्विट -
यापूर्वी ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते, त्या ट्विटला मोदी यांनी हे उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी ट्विट केले होते, की ''कठीन काळात मित्राकडू मदतीची आवश्यकता असते. हायड्रोक्लोरोक्वीन औषध देण्यासाठी भारत आणि भारतीयांचे आभार. कोरोना विरोधातील या लढाईत केवळ भारतच नाव्हे, तर मानवतेच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदींनी केलेले सहकार्यही कधीच विसरता येणार नाही''
ट्रम्प म्हणाले होते मोदी महान नेते -
भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला मंजूरी दिल्यानंतर फॉक्स न्यूजसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले होते, भारताने आपल्या जनतेचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. पंतप्रधान मोदी हे महान नेते आहेत. भारतातून आद्याप खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी येणे बाकी आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिकेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे 29 मिलियन डोस विकत घेतले आहेत. त्यापैकी सर्वाधिक औषधी भारतातून येणार आहे.
यापूर्वी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी हाटवली नाही, तर अमेरिका आवश्यकत्या कारवाईसंदर्भात विचार करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी केला जात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या औषधाची मागणी केली होती.