दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी चित्रपट अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल बुधवारी तीव्र दु:ख व्यक्त केले. लोकप्रिय अभिनेते आणि समर्पित नेते म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असे नरेंद मोदी म्हणाले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले, असे टिष्ट्वट त्यांनी केले. अभिनयाची दैवी देणगी लाभलेले अभिनेते म्हणून विनोद खन्ना कायम स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली.लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृदू आणि भावनाशील अभिनेत्याच्या रूपात जगभरातील चाहत्यांचे मन जिंकणारे विनोद खन्ना ज्येष्ठ आणि निष्ठावान राजकारणी व एक प्रतिभावंत अभिनेतेही होते, असे महाजन यांनी शोकसंदेशात म्हटले.दिग्गज अभिनेता असूनही कोणतीही प्रौढी नाही... विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मिळून-मिसळून वागणारे... आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे कसब, अशा अभिनेत्याच्या विविध आठवणींना एफटीआयआयमध्ये उजाळा मिळाला. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना एफटीआयआयच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विनोद खन्ना २००१ ते २००५ या काळात संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास या वेळी छायाचित्रांच्या माध्यमातून झळकला. (वृत्तसंस्था)नांदेड-अमृतसर-पाटणा विमानसेवा सुरू करा - मोदीनांदेड : नांदेड-अमृतसर व पाटणा या शीख धर्मियांच्या तीर्थस्थळांसाठी विमानसेवा सुरू करावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिले़ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडान या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील नांदेड-हैदराबाद विमानसेवेचा प्रारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला़ या वेळी पंतप्रधान म्हणाले, सामान्य माणसाला परवडेल अशा दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे़ (प्रतिनिधी)
पंतप्रधान मोदी, सोनिया यांची विनोद खन्ना यांना श्रद्धांजली
By admin | Published: April 28, 2017 2:53 AM