शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

भारतात घुसलेल्या 'लष्कर'च्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी

By admin | Published: December 06, 2015 1:52 PM

कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तय्यबा'चे चार दहशतवादी भारतात घुसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 'निशाण्यावर' असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तय्यबा'चे चार दहशतवादी भारतात घुसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 'निशाण्यावर' आहेत, अशी खात्रीलायक माहिती गप्तचर विभागाने दिल्ली पोलिसांना दिली आहे. काही प्रतिष्ठित नामवंतांना लक्ष्य बनवून राजधानी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने आखल्याची माहिती समोर येत असून दिल्ली पोलिसा त्या दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला लष्करचे दोन संशयित सदस्य दुजाना आणि उकाशा यांच्याबद्दल गोपनीय सूचना प्राप्त झाल्यानंतर, हा कट उघडकीस आल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला. या दोघांनी पाकव्याप्त काश्मिरातून जम्मू-काश्मिरात घुसखोरी केली व आता ते दिल्लीत शिरल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी जेथे असतीली तेथे पॅरिससारखा अथवा मुंबईतील २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. दहशतवाद्यांमधील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले असून त्यात ‘व्हीआयपी’  हा शब्द अनेकवेळा  उच्चारण्यात आला आहे. 
दरम्यान या सर्व माहितीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू असून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
ग्रेनेडहल्ला शक्य
दुजाना आणि उकाशा हे दोघे लष्करचे सदस्य प्रदीर्घ काळ काश्मीर खोऱ्यात राहिले आहेत व दिल्लीत नामवंत लोकांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती अथवा ग्रेनेडहल्ला करण्याची त्यांची योजना आहे. या हल्ल्यात ते स्वत:चा वा लष्करच्या अन्य सदस्याचा वापर करू शकतात.