...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 8, 2021 12:47 PM2021-02-08T12:47:10+5:302021-02-08T12:47:34+5:30
शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले... (Narendra Modi in Rajya Sabha)
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी कोरोनापासून ते शेतकरी आंदोलनांपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. शेतकरी आंदोलनावर बोलताना मोदींनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचेही आभार मानले. (Prime Minister Modi thanked former Prime Minister Deve Gowda in the Rajya Sabha)
शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले, त्यांनी चर्चेला गंभीर रूप दिले. त्यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. तसेच त्यांनी या विषयावर काही सूचनाही दिल्या. ते शेतकरी प्रश्नांशी जोडलेले आहेत. त्यामुळे शेतीची मूलभूत समस्या काय? याची मुळं शोधली जायला हवीत.
शेतकरी आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प -
शेतकरी आंदोलन कसे सुरू आहे, वैगेरे यावर सर्वच जण बोलले. मात्र, हे आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प आहेत. या मुद्द्यावर जर मूलभूत चर्चा झाली असती तर अधिक बरे झाले असते. शिवाय, कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरे कुणीही देत नाही, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत -
काळानुसार बदलणे ही काळाची गरज आहे, जे लोक राजकीय प्रतिक्रिया देत आहेत, त्यांनीही या सुधारणांवर अनेकदा भाष्य केले आहे, परंतु कोणीही पुढाकार घेतला नव्हता, कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत, चर्चा करावी, जे काही चांगले होईल त्याचे श्रेय आपण घ्या. चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा करावी, असे मोदी विरोधकांना उद्देशून म्हणाले.
MSP होता, आहे अन् राहणार -
एकदा सुधारणा करून लाभ होतो की नाही, हे पाहायला हवे, त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करूया. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल. याबरोबरच MSP आहे आणि भविष्यातही राहणारच, त्यामुळे अफवा पसरवू नका. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आणखी काम करायचे आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये, असेही मोदी यांनी विरोधकांना उद्देशून म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते देवेगौडा -
सध्या देशात छोटे शेतकरी 90 टक्के आहेत आणि या 90 टक्के शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच हे कायदे तयार करण्यात आले आहेत. या पूर्वीची सरकारंही छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत, सातत्याने त्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा करत होते. एवढेच नाही, तर कृषी मंत्र्यांनी आंदोलन संपविण्याचा प्रयत्नही केला आणि विरोध संपवण्यासाठी आंदोलकांशी 11 वेळा चर्चाही केली, असे देवेगौडा म्हणाले होते.
'मोदी है, मौका लिजिए'; भाषणाच्या शेवटच्या वाक्यावर नरेंद्र मोदींचा खणखणीत 'चौका'
तसेच, शेतकरी आंदोलनता वातारवण खराब करण्याची इच्छा असलेले लोकही आहेत. 26 जानेवारीला झालेल्या घटनेतही, असेच लोक होते. अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा करायला हवी, असेही देवेगौडा यांनी म्हटले होते.