शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 08, 2021 12:47 PM

शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले... (Narendra Modi in Rajya Sabha)

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी कोरोनापासून ते शेतकरी आंदोलनांपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. शेतकरी आंदोलनावर बोलताना मोदींनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचेही आभार मानले. (Prime Minister Modi thanked former Prime Minister Deve Gowda in the Rajya Sabha)

शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले, त्यांनी चर्चेला गंभीर रूप दिले. त्यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. तसेच त्यांनी या विषयावर काही सूचनाही दिल्या. ते शेतकरी प्रश्नांशी जोडलेले आहेत. त्यामुळे शेतीची मूलभूत समस्या काय? याची मुळं शोधली जायला हवीत.

Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?

शेतकरी आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प -शेतकरी आंदोलन कसे सुरू आहे, वैगेरे यावर सर्वच जण बोलले. मात्र, हे आंदोलन नेमके कशासाठी, यावर सगळेच गप्प आहेत. या मुद्द्यावर जर मूलभूत चर्चा झाली असती तर अधिक बरे झाले असते. शिवाय, कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरे कुणीही देत नाही, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत -काळानुसार बदलणे ही काळाची गरज आहे, जे लोक राजकीय प्रतिक्रिया देत आहेत, त्यांनीही या सुधारणांवर अनेकदा भाष्य केले आहे, परंतु कोणीही पुढाकार घेतला नव्हता, कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत, चर्चा करावी, जे काही चांगले होईल त्याचे श्रेय आपण घ्या. चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा करावी, असे मोदी विरोधकांना उद्देशून म्हणाले.

Narendra Modi: “MSP होता, आहे अन् राहणार; चूक झाली तर माझ्या माथी मारा, चांगलं झालं तर श्रेय तुम्ही घ्या”

MSP होता, आहे अन् राहणार - एकदा सुधारणा करून लाभ होतो की नाही, हे पाहायला हवे, त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करूया. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल. याबरोबरच MSP आहे आणि भविष्यातही राहणारच, त्यामुळे अफवा पसरवू नका. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आणखी काम करायचे आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये, असेही मोदी यांनी विरोधकांना उद्देशून म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते देवेगौडा -सध्या देशात छोटे शेतकरी 90 टक्के आहेत आणि या 90 टक्के शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच हे कायदे तयार करण्यात आले आहेत. या पूर्वीची सरकारंही छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत, सातत्याने त्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा करत होते. एवढेच नाही, तर कृषी मंत्र्यांनी आंदोलन संपविण्याचा प्रयत्नही केला आणि विरोध संपवण्यासाठी आंदोलकांशी 11 वेळा चर्चाही केली, असे देवेगौडा म्हणाले होते.

'मोदी है, मौका लिजिए'; भाषणाच्या शेवटच्या वाक्यावर नरेंद्र मोदींचा खणखणीत 'चौका'

तसेच, शेतकरी आंदोलनता वातारवण खराब करण्याची इच्छा असलेले लोकही आहेत. 26 जानेवारीला झालेल्या घटनेतही, असेच लोक होते. अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा करायला हवी, असेही देवेगौडा यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाh d deve gowdaएच. डी. देवेगौडाcongressकाँग्रेसBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलन