बेंगळुरू : जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीत भारत एक ‘तेजस्वी बिंदू’ आहे, असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी गुंतवणूकदारांना बळकट बौद्धिक संपदा अधिकार संरक्षणासह देशात व्यापार करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे आश्वासन दिले. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) पुढील वर्षी लागू होईल, अशी आशाही मोदी यांनी व्यक्त केली.व्यापार आणि उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या सरकारच्या प्रतिज्ञाबद्धतेचा पुनरुच्चार करून मोदी म्हणाले, ‘देशाबाहेरील कौशल्य, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आत्मसात करण्यासाठी भारत एवढ्या चांगल्याप्रकारे पूर्वी कधीही तयार नव्हता. आम्ही संसदेत जीएसटी विधेयक मांडले. जीएसटी २०१६ मध्ये लागू होईल, अशी आशा आहे.’ मोदी भारत-जर्मनी शिखर संमेलनाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल याही मंचावर विराजमान होत्या. (वृत्तसंस्था)
पंतप्रधान मोदींचे विदेशी गुंतवणूकदारांना निमंत्रण
By admin | Published: October 07, 2015 12:56 AM