लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चंद्रयान मोहिमेच्या यशाने भारावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (इस्रो) महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना आणि २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याचे आवाहन केले.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी २१ ऑक्टोबर रोजी अंतराळवीरांचे अंतराळात उड्डाण आणि त्यांचे सुखरूप पृथ्वीवर परतण्यासाठीच्या यंत्रणेचे (क्रू एस्केप सिस्टम) पहिले चाचणी उड्डाण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी इस्रोला नवे लक्ष्य दिले आहे.
तपशीलवार शोध घ्या...पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भविष्याची रूपरेषा सांगितली आणि शास्त्रज्ञांना शुक्र, मंगळ मोहिमांसह आंतरग्रहीय मोहिमांवर काम करण्यास आणि चंद्राचा तपशीलवार शोध घेण्याचे आवाहन केले. मोदींनी इस्रोच्या क्षमतांवर विश्वास व्यक्त केला.
नव्या मोहिमांचा आढावाइस्रोच्या चंद्र संशोधन योजनांमध्ये चंद्रयान मोहिमा, नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकलसारखे नवीन रॉकेट विकसित करणे, नवीन लाँचपॅड तयार करणे, मानवकेंद्रित प्रयोगशाळा आणि संबंधित तंत्रज्ञान स्थापित करणे, आदींचा समावेश असेल. अंतराळ विभागाने गगनयान मोहिमेचे विहंगावलोकन सादर केले.
कोरोनामुळे उशीरदोन अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘गगनयान’चे २०२२ मध्ये प्रक्षेपण नियोजित होते. तथापि, कोविड महामारी आणि मोहिमेच्या गुंतागुंतीमुळे विलंब झाला.