पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:51 PM2024-11-15T16:51:01+5:302024-11-15T16:52:33+5:30
...यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक झाली, परिणामी इतर उडाणांवरही याचा परिणाम झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान शुक्रवारी (15 नोव्हेंबर, 2024) तांत्रिक बिघाडामुळे देवघर एअरपोर्टवर थांबले आहे. यामुळे एअर ट्रॅफिकवरही परिणाम झाला आहे. मोदी जमुईतील चाकईमध्ये सभा करून परतत होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान उड्डाण होऊ शकले नाही. यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक झाली, परिणामी इतर उड्डाणांवरही याचा परिणाम झाला.
दरम्यान, गोड्डातील महागामा येथे निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे चॉपरही एक तासांपर्यंत अडकून राहिले. एअर ट्रॅफिक ब्लॉकमुळे त्यांचे चॉपरही जवळपास 2 वाजून 50 मिनिटांनी उड्डाण करू शकले. याशिवाय, झारखंडमधील दुमका येथेही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे चॉपरही बऱ्याच वेळ अडकून पडले होते. या सर्व घटनांमगचे कारण म्हणजे, पंतप्रधानांचे विमान देवघर विमानतळावर उभे होते. यामुळे एअर ट्रॅफिक ब्लॉक करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींचे विमान अद्यापही देवघर एअरपोर्टवरच असल्याचे समजते.
Prime Minister Narendra Modi's aircraft experienced a technical snag due to which the aircraft has to remain at Deoghar airport causing some delay in his return to Delhi. pic.twitter.com/8IKaK6yttz
— ANI (@ANI) November 15, 2024
माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. हे विमान जोवर दुरुस्त होत नाही, तोवर विमान देवघर विमानतळावरच राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२४ रोजी झारखंडमध्ये दोन सभांना संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. खरे तर, झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. या कार्यक्रमालाही पंतप्रधान मोदींची पोहोचले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.