शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

मोदींच्या कॅबिनेटनं घेतले मोठे निर्णय, सामान्य माणसांवर पडणार थेट प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 4:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. या कॅबिनेटच्या बैठकीत नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशन (National Technical Textile Mission)ला मंजुरी देण्यात आली आहे. टेक्निकल टेक्सटाइल मिशनबरोबरच कॅबिनेटनं सरोगसी एमेंडमेंट एक्ट (Surrogacy (Regulation) Amendment Act )वरही शिक्कामोर्तब केलं आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. या कॅबिनेटच्या बैठकीत नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशन (National Technical Textile Mission)ला मंजुरी देण्यात आली आहे. टेक्निकल टेक्सटाइल मिशनबरोबरच कॅबिनेटनं सरोगसी एमेंडमेंट एक्ट (Surrogacy (Regulation) Amendment Act )वरही शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे सरोगसी कायदा आणखी कडक होणार आहे. त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगातील दोन संस्थांना राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशनला मंजुरीः कॅबिनेटच्या बैठकीत नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशनला मंजुरी देण्यात आली आहे. या मिशननं देशातल्या टेक्सटाइल इंडस्ट्रीला दिलासा मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2020ला सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये  वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशनची घोषणा केली आहे. भारत दरवर्षी जवळपास 1600 कोटी डॉलर (जवळपास 1.13 लाख कोटी रुपये)चे टेक्निकल टेक्सटाइल आयात करतो. आयातमध्ये कपात आणण्यासाठी या मिशनवर 1,480 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. टेक्निकल टेक्सटाइलचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो. मेडिकल सेक्टर आणि ऍग्रो सेक्टरमध्येही याचा वापर केला जातो. सामान्य भाषेत सांगायचं झाल्यास टेक्नोलॉजीच्या माध्यमातून असे प्रोडक्ट तयार केले जाणार असून, इतर सेक्टरना यानं मदत मिळणार आहे.  याचा प्रयोग संरक्षण अन् कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये होतो. यासाठी 1480 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पीएम मोदी यांच्या नेतृत्वात 207 तांत्रिक वस्त्रोद्योगांचे कोड बनविण्यात आले. या माध्यमातून 50 हजार लोकांना कौशल्य देण्याची व्यवस्था केली जाईल. सरोगसी कायद्यात बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रात 50 बिलियन डॉलर्सची निर्यात होत असून, 16 बिलियन डॉलर्सच्या टेक्निकल टेक्सटाइलचं आयात केलं जातं. आयात कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने बजेटमध्ये 1,480 कोटी रुपयांची तरतूद करून नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्याची घोषणा केली.सरकारचे हे अभियान 2020-2021 ते 2023-2024 दरम्यान राबविण्यात येईल. अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणाले की उद्योग व वाणिज्य विकासासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी 27,300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्यातदारांच्या कर्तव्यात आणि करात या वर्षापासून डिजिटल परताव्यास परवानगी देण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी