सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसंच दररोज देशात रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांसी संवाद साधला. "कठीण परिस्थितीतही आपण धैर्य सोडू नये. आपण योग्य प्रयत्न केले तर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो. हेच डोळ्यासमोर ठेवून देश आज दिवसरात्र काम करतोय. गेल्या काही दिवसांत घेतलेले निर्णय परिस्थिती सुधारेल," असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. ऑक्सिजनची कमतरता भासत आहे त्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजनची निर्मिती करण्यावरही प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. "यावेळी कोरोनाच्या केसेस वाढल्या वाढल्याच देशातील फार्मा कंपन्यांनी औषध कंपन्यांनी उत्पादन वाढवलं आहे. औषध कंपन्या अजूनही उत्पादन वाढवत आहेत. अनेक कंपन्यांची मदत घेतली जात आहे," असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यांना लॉकडाऊनच्या पर्यायाचा अंतिम पर्याय म्हणून विचार करण्याचा सल्लाही दिला.
१ मे पासून मोठ्या प्रमाणात लसीकरणसध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत असून सरकारकडूनही यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसंच आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. १ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी मंगळवारी लस उत्पादकांशीही संवाद साधला. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली ही तिसरी बैठक होती. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतल्या होत्या बैठकायापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोनाशी निगडीत विषयांवर २ महत्त्वाच्या बैठका घेतल्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील मोठ्या डॉक्टरांशीही संवाद साधला होता. त्यानंतर देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्राकडूनही आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे.