अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसाचा गुजरात दौरा सुरू आहे. आज पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशाला आता तिसरी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. ही ट्रेन मुंबई ते गुजकरातमधील गांधीनगर अशी चालणार आहे. पंतप्रधान मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असताना भारत माता की जय च्या घोषणाबाजी सुरू होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गांधीनगर रेल्वेस्थानकावरुन 'वंदे भारत एक्सप्रेसला' हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेने ५ तास २५ मिनिटात गांधीनगरमधून मुंबईला पोहाचू शकतो. पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या गांधीनगरपासून कालापूरपर्यंत प्रवास करणार असल्याचे बोलले जात आहे. यासह मोदी अहमदाबाद मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस उद्यापासून धावणार
वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. ही पूर्णपणे एसी असणार आहे. त्यासोबतच स्लाइडिंग दरवाजे, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, मोबाइल चार्जिंग पॉइंट, अटेंडेंट कॉल बटन, बायो-टॉयलेट, स्वचालित द्वार, सीसीटीवी कॅमेरे, रिक्लाइनिंग सुविधा, आरामदायक सीट असणार आहेत.
नुकताच रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान रविवार सोडून दररोज धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी १०. ३० वाजता गांधीनगर येथून वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. प्रवाशांसाठी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस अहमदाबाद स्थानकावरून सकाळी १४. ०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १९.३५ वाजता पोहचले.
वेळापत्रक
मुंबई सेंट्रल येथून सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गांधीनगरला पोहचेल. गांधीनगर येथून दुपारी १४.०५ वाजता सुटेल रात्री १९.३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहचेल सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी धावणार आहे.
तिकीट दर
चेअर कार तात्पुरते भाडे (केटरिंग शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत- ६९० रुपये, मुंबई सेंट्रल ते वडोदरा- ९०० रुपये , मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद - १०६० रुपये, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर -१११५ रुपये तर एक्सकेटीव्ह क्लाससाठी तात्पुरते भाडे (खानपान शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत-१३८५ रुपये , मुंबई सेंट्रल ते वडोदरा - १८०५ रुपये , मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद-२१२० रुपये , मुंबई सेंट्रल ते गांधीनगर- २२६० रुपये असणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".