- शरद गुप्ता
नवी दिल्ली : दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथील पीएम संग्रहालयात येणाऱ्या प्रेक्षकांना जानेवारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही गॅलरी पाहायला मिळणार आहे. या गॅलरीचे काम सुरू झाले आहे. जानेवारीपर्यंत ही गॅलरी प्रेक्षकांसाठी खुली केली जाणार आहे.
या संग्रहालयात नोव्हेंबरपासून लाइट ॲण्ड साउंड शोही सुरू केला जाणार आहे. याची सुरुवात भारताच्या अंतराळ मिशनपासून होणार आहे. पीएम संग्रहालय २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले होते.
तेव्हापासून ३० सप्टेंबरपर्यंत १ लाख ५१ हजार १६१ प्रेक्षकांनी भेट दिली आहे. १५ ऑक्टोबरला एकाच दिवसात विक्रमी ३,२३३ इतक्या प्रेक्षकांनी भेट दिली आहे.