पोर्ट ब्लेअर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत. अंदमान-निकोबारमध्ये पोहोचल्यानंतर मोदींनी 2004च्या सुनामीत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी अंदमान-निकोबारमधली जेलही पाहिली. त्यानंतर मोदींनी पोर्ट ब्लेअरमध्ये एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हॅवलॉक द्वीप, नील द्वीप आणि रॉस द्वीपचं नाव बदलण्याची घोषणा केली. तसेच अंदमान-निकोबारला डीम्ड युनिव्हर्सिटीचं गिफ्ट दिलं.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप असं केलं आहे. नील द्वीप आता शहीद द्वीप म्हणून ओळखलं जाणार आहे. तर रॉस द्वीपचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं केलं. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्यसेनानींची आठवण येते, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव गौरव आणि सन्मानानं घेतलं जातं. आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान सुभाष बाबूंनी अंदमानच्या धरतीवरून भारताच्या स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं. आझाद हिंद सेनेनं इथे तिरंगा फडकावला. मोदी म्हणाले, 30 डिसेंबर 1943च्या त्या ऐतिहासिक घटनेला आज 75 वर्षं पूर्ण झाली आहे. यावेळी मोदींनी 150 फूट उंच झेंड्याचं ध्वजारोहण केलं.
पंतप्रधान मोदींची अंदमान-निकोबारला मोठी गिफ्ट, 3 द्वीपांचं केलं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 7:33 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत.
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान-निकोबार या द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी हॅवलॉक द्वीप, नील द्वीप आणि रॉस द्वीपचं नाव बदलण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप असं केलं