Digvijay Singh On Narendra Modi : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेले सिलिंडर भरता येत नाही. मीडिया रिपोर्ट शेअर करत दिग्विजय सिंह (digvijay singh attack on pm modi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ''मोदीजी एक रुपया देतात आणि १० रुपये सर्वसामान्यांच्या खिशातून काढतात", असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी भारताची तुलना श्रीलंकेतील परिस्थितीशी केली आहे.
कुणी केंद्राला विरोध केला तर हिंदू धर्म धोक्यात येतो, असे ते म्हणाले. वाढत्या महागाईमुळे लोकांना स्वयंपाकाचा गॅस सोडून स्टोव्ह पुन्हा पेटवावा लागला. श्रीलंकेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमागे अधिक कर्ज घेणे हे एक कारण असल्याचेही दिग्विजय सिंह म्हणाले. मोदींच्या कार्यकाळात भारतावरील कर्ज प्रचंड वाढले आहे. कोणी प्रश्न विचारला तर हिंदू धर्म धोक्यात आहे, असे म्हटले जाईल आणि तुम्ही जर मोदींना प्रश्न करत आहात. तर तुम्ही पाकिस्तानी आहात, तुम्ही देशद्रोही आहात, जय श्री राम, असंही सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"किती दिवसांत भारताची श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल हे माहिती नाही. पण आम्हाला त्याची चिंता नाही कारण हिंदू धर्म धोक्यात आहे जय श्री राम. श्रीलंकेने आपल्या जीडीपीच्या ९५ टक्के कर्ज घेतले आहे", असंही दिग्विजय यांनी ट्विट केलं आहे. दिग्विजय सिंह वारंवार महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. श्रीलंका आणि भारतातील परिस्थितीबद्दल ते ट्विट करत आहेत. त्याचबरोबर ते आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर असतात.