हरीश गुप्तानवी दिल्ली : आपल्या सर्व मंत्र्यांची ९ तासांची बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दोन आठवड्यांत मिळून प्रत्येक मंत्रालयवार बैठका घेण्याचे ठरविले आहे. या काळात दिल्लीबाहेरचे सर्व दौरे टाळावेत आणि बैठकीला तयारीनिशी यावे, अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाने केल्या आहेत. पायाभूत सुविधा, शेती, ग्रामीण विकास या विषयांवर तुम्ही पुढील पाच वर्षांत काय करणार आहात, याचे चित्र सादर करण्यास मंत्र्यांना सांगण्यात आले आहे.केंद्रात ५६ मंत्री असून, त्यांच्यासह खात्यांचा आढावा घेणाऱ्या बैठका उद्या, मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या बैठकांना केवळ कॅबिनेट मंत्रीच नव्हे, तर स्वतंत्र कार्यभार असलेले, तसेच राज्यमंत्री यांनाही हजर राहावे लागणार आहे. या बैठकांतून पुढील २0२४ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकांपर्यंतचा कार्यक्रम तयार केला जाणार आहे. मोदी यांनी शनिवारी नागरी विमान वाहतूक, नगरविकास, रेल्वे, शेती व जलशक्ती या खात्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला होता. पुढील बैठकांतून पाच वर्षांचा व्हिजन २0२५ हा आराखडा तयार केला जाणार आहे. या बैठकांत अर्थातच संबंधित खात्यांचे सचिवही असतील. मंत्र्यांना केवळ आपल्याच मंत्रालयाची नव्हे, तर अन्य खात्यांचीही माहिती असायला हवी. तसे केले तरच सर्व खात्यांमध्ये समन्वयाने काम होईल आणि विकास कामांतील अडथळेही दूर होतील, असे पंतप्रधान मोदी यांना वाटत आहे.>आश्वासनांची अंमलबजावणी हवीनंतरच्या टप्प्यामध्ये खासदारांच्याही याच पद्धतीच्या बैठका घेण्याचे त्यांनी ठरविले आहे. केवळ भाजपच्या खासदारांसाठीच त्या बैठका असतील. २0१९ च्या निवडणुकांच्या वेळी जी आश्वासने दिली होती, ती २0२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी ही तयारी चालविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दिल्लीत घेणार मंत्रालयांच्या बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 6:18 AM