नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. रविवारी (१४ जुलै) त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. यासह नरेंद्र मोदी सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी म्हणाले, "या माध्यमात राहून खूप आनंद झाला. चर्चा, वादविवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद, रचनात्मक टीका आणि बऱ्याच गोष्टींचा आनंद घेत आहे. भविष्यात सुद्धा अशाच आकर्षक वेळेची वाट पाहत आहे."
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (३८.१ दशलक्ष फॉलोअर्स), दुबईचे शासक शेख मोहम्मद (११.२ दशलक्ष फॉलोअर्स) आणि पोप फ्रान्सिस (१८.५ दशलक्ष फॉलोअर्स) यांसारख्या जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप पुढे आहेत. एक्सवर नरेंद्र मोदींची लोकप्रियता लक्षात घेता, जगभरातील नेते नरेंद्र मोदींसोबत सोशल मीडियावर व्यस्त राहण्यास उत्सुक आहेत. कारण त्यांच्यासोबत जोडल्याने त्यांचे स्वतःचे फॉलोअर्स, व्ह्यू आणि पोस्ट्स लक्षणीयरीत्या वाढतात. अलीकडे इटली आणि ऑस्ट्रियामध्येही हे दिसून आले.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे २६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे १९.९ दशलक्ष फॉलोअर्स, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ७.४ दशलक्ष फॉलोअर्स, राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे २.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
प्रसिद्ध सेलिब्रिटींनाही नरेंद्र मोदींनी टाकले मागे टेलर स्विफ्ट - ९५.३ दशलक्षलेडी गागा - ८३.१ दशलक्षकिम कार्दशियन -७५.२ दशलक्षविराट कोहली – ६४.१ दशलक्षनेमार जूनियर – ६३.६ दशलक्षलेब्रॉन जेम्स – ५२.९ दशलक्ष
इंस्टाग्रामवर नरेंद्र मोदींचे ९१.२ दशलक्ष फॉलोअर्समेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पीएम मोदींचे ९१.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इथे पंतप्रधान कोणाला फॉलो करत नाहीत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ८०६ पोस्ट केल्या आहेत. तर १३.८३ दशलक्ष लोकांनी इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर पंतप्रधानांच्या चॅनेलला फॉलो केले आहे.