ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच रेल्वेमंत्री अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मदत आणि बचाव कार्य वेगात होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आज सकाळी ट्विट करत पंतप्रधानांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. "हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले या धक्क्यातून लवकर सावरोत यासाठी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
My thoughts are with those who lost their loved ones due to the derailment of Jagdalpur-Bhubaneswar Express. The tragedy is saddening: PM— ANI (@ANI_news) 22 January 2017
The Railway Ministry is monitoring the situation very closely and is working to ensure quick rescue and relief operations: PM Narendra Modi— ANI (@ANI_news) 22 January 2017