शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 75वी जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 8:34 AM

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे.

ठळक मुद्देदेशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल हे यावेळी उपस्थित होते. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. 1984 पासून ते 1989 पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईमध्ये झाला होता आणि 21 मे, 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे 21 मे 1991 रोजी  महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस या आठवड्यात पूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. राजीव गांधी यांचे योगदान, विविध क्षेत्रांतील त्यांची कामगिरी यावर यानिमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. काँग्रेसने मंगळवारी (20 ऑगस्ट) दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात एक स्मृती कार्यक्रम आयोजित केला आहे. 

राजीव गांधींच्या योगदानाला राहुल यांनी दिला उजाळा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील योगदानावर भाष्य केले आहे. या आठवड्यात आम्ही राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त पूर्ण देशात स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. आठवड्यात दररोज वडिलांच्या उल्लेखनीय कामगिरीवर लक्ष वेधून घेणार आहे असं म्हटलं आहे. सोमवारी आयटी क्षेत्राबाबत माहिती देत त्यांनी 55 सेकंदांची एक क्लिप जारी केली. 

इंदिरा गांधींवर वेब सिरीज

‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’मुळे चर्चेत आलेले रितेश बत्रा आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेत्री विद्या बालनची ही पहिली वेब सिरीज आहे. ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर ही वेब सिरीज आधारित आहे. 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी