पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी उरुसाच्या निमित्ताने अजमेरमधील दरगाह शरीफसाठी चादर भेट दिलीन आहे. ही चादर १३ जानेवारी रोजी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर सादर भेट दिली जाणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुस्लीम समुदायातील सदस्यांच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे ही चादर सुपूर्द केली. ही चादर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या स्मृतिदिनी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये अजमेर शरीफ येथील दर्ग्यात अर्पण केली जाईल.
पीएम मोदी यांनी एक्सवर लिहिले की, मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळाशी भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेत मी पवित्र चादर सोपवली. ती ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरुसावेळी प्रतिष्ठित अजमेर शरीफ येथील दर्ग्यावर अर्पण केली जाईल. या भेटीवेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी आणि भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी हे उपस्थित होते.