नवी दिल्लीः संयुक्त राष्ट्रातील महासभा आणि हाऊडी मोदी कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर भारतात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शनिवारी पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह मनोज तिवारी आणि भाजपाचे अनेक नेते, खासदार उपस्थित होते. त्यांच्यासाठी विमानतळावर एक मंचही तयार करण्यात आला होता. त्या मंचावरून उपस्थितांना संबोधित करताना मोदींना तीन वर्षांपूर्वी उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची आठवण झाली.मोदी म्हणाले, आज 28 सप्टेंबर आहे, तीन वर्षांपूर्वी याच तारखेला पूर्ण रात्री एका क्षणासाठीही झोपलो नव्हतो. पूर्ण रात्री जागवून काढली. प्रत्येक वेळी टेलिफोनची रिंग कधी वाजणार याची मी वाटत पाहत होतो. 28 सप्टेंबरला भारतातल्या वीर जवानांच्या पराक्रमानं एक सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे. मोदी म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच 28 सप्टेंबरच्या रात्रीच माझ्या देशाच्या वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करून भारताची आन-बान-शान जगासमोर वाढवली. मी आज त्या रात्रीची आठवण काढून वीर जवानांच्या शौर्याला सलाम करतो. त्यांचं अभिनंदन करतो. मोदींनी केला हाऊडी मोदीचा उल्लेखपंतप्रधान मोदींनी हाऊडी मोदीचा उल्लेख करत ह्युस्टनमध्ये झालेल्या भव्य समारंभाची आठवण सांगितलं. त्या कार्यक्रमाची भव्यता, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं तिथे येणं, जगाला भारत अन् अमेरिकेच्या मैत्री जाणीव होणं हे सर्व आहेच. परंतु अमेरिकेच्या आपल्या भारतीय भावा-बहिणींनी ज्या एकतेच्या शक्तीचं प्रदर्शन केलं तेसुद्धा वाखाणण्याजोगं असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
अमेरिकेवरून परतताच मोदींना सर्जिकल स्ट्राइकची आठवण; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 7:59 AM