नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्तानं मोदींनी आज जनतेला संबोधित केलं आहे. जगात वाघांची घटती संख्या चिंताजनक असल्याचं मोदी म्हणाले आहे. सद्यस्थितीत भारतात फक्त 3 हजार वाघ आहेत. मोदींनी अखिल भारतीय व्याघ्र अंदाज 2018 जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, 2014च्या तुलनेत वाघांची संख्या 741नं वाढली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या माहितीनुसार, 2014च्या शेवटी झालेल्या जनगणनेनुसार भारतात 2226 वाघ होते, जे 2010च्या तुलनेत जास्त आहेत. देशभरात सध्या 2 हजार 967 वाघ आहेत.
वाघांची घटती संख्या चिंताजनक- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 10:21 AM