नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबत घेतलेल्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरला केंद्रशासित घोषित करण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीजम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यामागचे कारण सांगितले. आज देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जम्मू काश्मीरला केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. काही काळापूर्वी काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यापासून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जम्मू काश्मीरसाठी आखलेल्या कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. प्रशासनामध्ये गतिशिलता आली आहे. तसेच विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे. विशेषकरून रस्तेबांधणी, रेल्वेसारखे प्रकल्प मार्गी लागत आहेत.''
Jammu Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले जम्मू काश्मीरला केंद्रशासित करण्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 8:35 PM