काँग्रेसच्या राजघराण्यातील राजकुमार सध्या देशभराता फिरून सांगत आहेत की, आता तुमच्या मालमत्तेचा एक्स-रे होणार. आपल्या माता-भगिनींकडे असलेली पवित्र संपत्ती. मंगळसूत्र असो अथवा इतर कुठल्याही प्रकारचे दागिने असोत, ते पवित्र मानले जाते. काँग्रेस आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी ते जप्त करून वाटून टाकण्याची जाहीर घोषणा करत आहे. जाहीरनाम्यात सांगत आहे. एक्स-रे करून लोकांना लुटण्याचा प्लॅन आखत आहेत. एवढेच नाही, तर हे जिवंतपणी तर सोडाच, पण मृत्यूनंतरही आपल्या पश्चात राहिलेली संपत्ती, जी आपल्या मुला-मुलींना मिळायला हवी, तीही आपण देऊ शकणार नाही.
मोदी म्हणाले, जर काँग्रेस सरकारमध्ये आली तर आपल्या कमाईचे अर्ध्याहून अधिक हिरावून घेईल. यासाठी काँग्रेसची वारसा टॅक्स लादण्याची तयारी आहे. वारसा टॅक्स (Inheritance Tax) संदर्भात जे तथ्य समोर येत आहेत, ते देशाचे डोळे उघडणारे आहे. पत्रकारांनीही ऐकावे. देशासोबत कसे कसे पाप झाले आहे, आज मी पहिल्यांदाच देशासमोर एक मजेशीर तथ्य मांडणार आहे.
मध्य प्रदेशातील मुरैना येथे बोलताना मोदी म्हणाले, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधान झाल्यानंतर, त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. मात्र, पूर्वी एक असा कायदा होता, की त्या संपत्तीचा एक भाग त्यांना मिळण्यापूर्वी, सरकार घेत होते. तेव्हा चर्चा होती की, इंदिरा जींच्या पश्चात त्यांची प्रॉपर्टी त्यांचा मुलगा राजीव गांधी यांना मिळणार होती. तेव्हा आपली प्रॉपर्टी वाचविण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधी जो Inheritance कायदा होता, तो संपुष्टात आणला आणि आपली संपत्ती वाचवली.
मोदी म्हणाले, जेव्हा स्वतःवर बितली तेव्हा कायदा बदलला आणि आता ते प्रकरण संपल्यानंतर, पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हे लोक तोच कायदा अधिक कडक करून परत आणण्याच्या विचारात आहेत. आपण अपल्या कुटुंबाची चार-चार पिढ्यांची प्रचं संपत्ती बिना टॅक्सची मिळवली आणि आता सर्वसामान्य जनतेच्या संपत्तीवर, कष्टाच्या कमाईवर टॅक्स लावून अर्धी संपत्ती लुटण्याचा विचा आहे. यामुळेच काँग्रेसची लूट म्हणजे, 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.'