पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करताना मधेच थांबले. सरकार गरीब, शेतकरी, युवा शक्ती आणि नारी शक्तीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, असे मोदी म्हणत असतानाच त्यांची नजर समोरील गर्दीमधील एका पिवळे कपडे परिधान केलेल्या बाळावर पडली. या चिमुकलीला तिच्या पालकांनी वर उचलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सेकंद त्या चिमुकलीकडे बघतच राहिले आणि नंतर म्हणाले, 'त्या चिमुकलीला त्रास नका देऊ.'
पंतप्रधान मोदी म्हणाले, ती फार छोटी आहे. हाताने इशारा करत मोदी म्हणाले, जर ती येथे असती (व्यासपीठावर) तर मी तिला भरपूर आशीर्वाद दिले असते. मात्र या थंडीत त्या चिमुकलीला त्रास नका देऊ. पंतप्रधान काही वेळ स्मित करत होते. यानंतर लोक घोषणा देऊ लागले.
आर्टिकल 370 चे भाजपल कनेक्शन! -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 वर येत असलेल्या चित्रपटासंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, मी ऐकले आहे की, कदाचित याच आठवड्यात 370 वर एक चित्रपट येत आहे. हा चित्रपट कसा आहे, हे मला माहीत नाही. मात्र, चांगलेच आहे, लोकांना खरी माहिती मिळण्यात कामी येईल. आज मी हिम्मत करून लोकांना म्हणालो आहे की, पुढच्या निवडणुकीत भाजपला 370 तर एनडीए ला 400 पार करा. आता जम्मू-काश्मीर एका संतुलित विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.